अकोला - राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करीत लेखनीबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
अकोला: आजपासून कृषी विद्यापीठतील कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी करत असलेल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. परिणामी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये हीच परिस्थिती आहे. या वेतनासाठी चारही विद्यापीठातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत लेखणीबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शहीद स्मारकासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली. यानंतर ही मागणी मान्य न झाल्यास वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून सरकारकडून सातवा वेतन आयोग मिळवून घेण्याचा निर्धार यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. या आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना निवेदन सादर केले आहे.