महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारीला, नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात

अकोला बार असोसिएशनची निवडणूक 12 फेब्रुवारीला होत आहे. त्याआधी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव पदांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या वकिलांच्या गटांमार्फत अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ही निवडणूक नेहमीच चुरशीची ठरत असते.

वकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारीला
वकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारीला

By

Published : Feb 5, 2021, 7:04 PM IST

अकोला -अकोला बार असोसिएशनची निवडणूक 12 फेब्रुवारीला होत आहे. त्याआधी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव पदांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या वकिलांच्या गटांमार्फत अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ही निवडणूक नेहमीच चुरशीची ठरत असते.

वकीलांची संघटना समजल्या जाणाऱ्या वकील संघाची निवडणूक येत्या 12 फेब्रुवारीला होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव पदासाठी ही निवडणूक होणार आहे. तीनही पदासाठी सध्या नामांकन अर्ज दाखल करणे सुरू आहे. अध्यक्ष पदासाठी दोन, उपाध्यक्ष पदासाठी दोन आणि सहसचिव पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही सहा फेब्रुवारी आहे. तर नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख नऊ फेब्रुवारी आहे.

वकील संघाची निवडणूक 12 फेब्रुवारीला

1 हजार 194 वकील करणार मतदान

या निवडणुकीत एक हजार 194 वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी पुरुष वकील मतदारांची संख्या 944 आहेत तर 250 एवढी स्त्री महिला वकिलांची संख्या आहे. दरम्यान आतापासूनच न्यायालयाच्या परिसरात उमेदवार असलेल्या वकिलांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल मतदानाच्या दिवशीच म्हणजे 12 फेब्रुवारीला लागणार आहे. अकोला वकील संघाची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळे या निवडणुकीत नेहमीच चढाओढ पहायला मिळते. उद्या सहा फेब्रुवारी रोजी कोणत्या पदासाठी किती अर्ज आणखी दाखल होतात, यावरून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details