अकोला -सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी अकोला प्रशासनातर्फे फिरते वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा यासोबतच काही वैद्यकीय अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज (रविवारी) सकाळी पाठविण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते. या पथकासोबत पालकमंत्रीसुद्धा रवाना झाले आहेत.
अकोला प्रशासनातर्फे पुरग्रस्तांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक रवाना
सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी अकोला प्रशासनातर्फे फिरते वैद्यकीय पथक आणि औषधांचा साठा यासोबतच काही वैद्यकीय अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज (रविवारी) सकाळी पाठविण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते. या पथकासोबत पालकमंत्रीसुद्धा रवाना झाले आहेत.
तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचार कार्यालयात पथकात सहभागी होणार्या डॉक्टरांचा तसेच रुग्णवाहिकाच्या चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोपाल खंडेलवाल, माजी आमदार नारायण गव्हाणकर, नगरसेवक हरीश आलीमचंदाणी, माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांच्यासह आदी उपस्थित होते. या पथकात ८ डॉक्टर, दोन फार्मासिस्ट, साथरोगीचे औषध, दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत.
पथकांजवळ विविध आजारांवरील औषधांचा साठा पाठवण्यात आला आहे. या मदतीमुळे पुरग्रस्तांना अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रातून मदत देण्यात आली आहे.