महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून आंदोलन, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी - seven pay commission

राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी आज विद्यापीठातील शहीद स्मारकाजवळ काळ्या फिती लावून आंदोलन केले.

seven pay commission
काळ्या फिती लावून आंदोलन

By

Published : Oct 27, 2020, 4:46 PM IST

अकोला - राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी आज विद्यापीठातील शहीद स्मारकाजवळ काळ्या फिती लावून आंदोलन केले. विशेष म्हणजे, चारही कृषी विद्यापीठाचे जॉइंट अग्रेस्कोअसून यावेळी मुख्यमंत्री व कृषिमंत्री ऑनलाइन राहणार असल्याने कर्मचार्‍यांनी ही संधी साधली आहे.

काळ्या फिती लावून आंदोलन

आंदोलनाची कारणे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. परिणामी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये हीच परिस्थिती आहे. या वेतनासाठी चारही विद्यापीठातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आजपासून विविध आंदोलनास सुरुवात केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शहीद स्मारकासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली. यानंतर ही मागणी मान्य न झाल्यास वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारकडून सातवा वेतन आयोग मिळवून घेण्याचा निर्धार यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे.

कुलसचिवांना निवेदन

विशेष म्हणजे, चारही विद्यापीठांची आज जॉइंट अग्रेस्को आहे. या अग्रेस्कोमध्ये मुख्यमंत्री व कृषिमंत्री उपस्थित राहणार आहे. याच संधीचं सोनं करण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन करत आपली मागणी समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना निवेदन सादर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details