अकोला - बोंड आळी नियंत्रणासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मात्र, दरवर्षी बोंड अळीचे मोठ्या प्रमाण वाढते. कपाशीवर बोंड अळी आल्याने ती खराब कपाशी शेतकऱ्यांनी अद्यापही काढलेली नाही. आगामी खरीप हंगामामध्ये शेतकर्यांचे आणखी बोंड आळीने नुकसान होवू नये म्हणून जे शेतकरी कपाशी काढु शकले नाही, अशा शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी मदत करावे, असे पत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले पश्चिम विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
यावर्षी बोंड आळी आणि बोंड सडमुळे एक लाख 42 हजार 476 हेक्टरवर नुकसान झाले आहे. परंतु, त्याची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात 2019 ते 2021 दरम्यान कपाशी संदर्भात नुकसान आकडेवारी पाहिली तर 2019 ते 2020 मध्ये सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये कापुसचाही समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे होवून त्याची शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. मात्र, 2020 ते 2021 यावर्षी जिल्ह्यात एक लाख 45 हजार 319 हेक्टर वर कपाशीची पेरणी झाली होती. त्यामध्ये एक लाख 42 हजार 476 हेक्टरवर बोंड अळी आणि बोंड सडमुळे नुकसान झाले होते.
बोंड आळी नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे हेही वाचा-विमान प्रवास महागणार; तिकिटावरील किमान दरात ५ टक्क्यांची वाढ
बोंड अळीवर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे-
नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला होता. परंतु, पंचनामे तयार न करण्याचे आदेश नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आगामी हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळे नुकसान होऊ नये म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी कपाशीवरील बोंड अळी नुकसानदायी ठरत आहे. हातचे पीक यामुळे नष्ट होत आहे. यावर ठोस उपाय नसल्याने शेतकरी व शास्त्रज्ञ हतबल झाले आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने आतापासूनच सावधानता बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी पश्चिम विदर्भातील जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.
हेही वाचा-टीसीएसकडून कोरोना महामारीतही कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनवाढ
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कुलुगुरुंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र-
अनेक शेतकऱ्यांची खराब कपाशी शेतात उभी आहे. तिला काढण्यासाठी शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे कपाशी तशीच शेतात आहे. परिणामी शेतकऱ्यांना ही कपाशी काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत करावी, यासाठी कुलगुरू डॉ. भाले यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहे. उभी असलेल्या पराटीला क्रश केल्यास त्यामध्ये असलेल्या बोंडाचा बारीक भुकटी होईल. त्यामध्ये बोंड अळी मरून जाऊन तिचीही भुकटी होईल. यामुळे संपूर्ण नाही 10 ते 12 टक्केच बोंड अळी जिवंत राहू शकते. त्यामुळे तिचे प्रमाण कमी करू शकू, असा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला आहे.