महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..त्यामुळे बँकेत पोहोचताच खातेदाराने फोडला बँकेचा काचेचा दरवाजा; गुन्हा दाखल - हिवरखेड स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा काचेचा दरवाजा तोडला

कामकाजाची वेळ संपल्यानंतर पोहोचलेल्या ग्राहकाला पुन्हा छोट्या कामासाठी बँकेत बाहेरगावाहून यावे लागत असल्याच्या कारणावरून ग्राहकाने हिवरखेडच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा काचेचा दरवाजा तोडला. बँकेचे शाखाधिकारी यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा काचेचा दरवाजा तोडला

By

Published : Nov 12, 2019, 7:34 AM IST

Updated : Nov 12, 2019, 9:31 AM IST

अकोला- कामकाजाची वेळ संपल्यानंतर पोहोचलेल्या ग्राहकाला पुन्हा छोट्या कामासाठी बँकेत बाहेरगावाहून यावे लागत असल्याच्या कारणावरून ग्राहकाने हिवरखेडच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा काचेचा दरवाजा तोडला आहे. बँकेचे शाखाधिकारी यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पायाने काचेचा दरवाजा तोडल्याने त्या व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना आकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. प्रशांत दादाराव वानखेडे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कामकाजाची वेळ संपल्यानंतर बँकेत पोहोचलेल्या ग्राहकाने फोडला बँकेचा काचेचा दरवाजा

हेही वाचा -मुंबई: घाटकोपरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खासदारांनी दिले पालिका अधिकाऱ्यांना सूचना

नवीन नियमानुसार बँकांची कामकाजाची वेळ दुपारी चार वाजेपर्यंतची झालेली आहे. परंतु, बऱ्याच ग्राहकांना याची माहिती नाही. अकोट येथील प्रशांत दादाराव वानखडे यांच्या पत्नीचे हिवरखेड स्टेट बँकेत खाते असून ते खाते इनॅक्टिव झाले होते. त्याबाबत काही दिवसांआधी बँकेत येऊन विचारणा केल्यानंतर या खात्याचे केवायसी करणे बंधनकारक असल्याची माहिती बँकेकडून त्यांना देण्यात आली. परंतु, केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी एक कागद कमी असल्यामुळे त्यांना पूर्ण कागदपत्रांसह पुन्हा येण्यास सांगितले होते. त्यानुसार 11 नोव्हेंबरला प्रशांत वानखडे हे आपल्या पत्नीसह लवकरच हिवरखेडसाठी निघाले. परंतु, अकोट हिवरखेड राज्यमार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली असल्यामुळे ते बँकेत पाच ते दहा मिनिटे उशिरा पोहोचले.

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा काचेचा दरवाजा तोडला

हेही वाचा -काँग्रेसच्या दिरंगाईने पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट ठरली निष्फळ !

दरम्यान, कामाची वेळ संपल्याने चार वाजल्यानंतर बँकेचे काचेचे प्रवेशद्वार बंद होते. त्यांनी दार उघडून आत येऊ देण्याची विनंती कर्मचाऱ्यांना केली. परंतु, चार वाजेनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणालाही आत घेता येत नाही, असे कँटीन बॉय विजय ईखार यांनी सांगितले. छोट्या कामासाठी इतक्या लांबवरून वारंवार चकरा मारायला लावल्यामुळे आणि पाच-दहा मिनिटांचा उशीर सहन न केल्यामुळे कंटाळून प्रशांत वानखडे यांचा संयम ढासळला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता काचेच्या प्रवेशद्वारावर जोरदार पाय मारून प्रवेशद्वार फोडले. काचा फोडल्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. बँकेच्या आत आणि बाहेर काचेचे तुकडे विखुरले होते.
त्यावेळी सर्व सामान्य नागरिकांनी प्रशांतला प्राथमिक उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेले. परंतु रक्‍त भरपूर वाहल्याने आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आकोट येथे हलवण्यात आले. या घटनेची तक्रार शाखाधिकारी प्रशांत संतोष सोनोने यांनी हिवरखेड पोलिसांकडे दिली. त्यावरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी प्रशांत दादाराव वानखडे (रा. दखनी प्लॉट, अकोट) यांच्यावर भारतीय दंड विधान 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शाखाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Last Updated : Nov 12, 2019, 9:31 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

sbi news

ABOUT THE AUTHOR

...view details