महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हरवलेला उमेश भेटला दोन वर्षांनी; आई-वडिलांना अश्रू अनावर - missing boy found in akola

बुलडाणा जिल्ह्यात राहणारा उमेश दोन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता. त्याला काहीच कळत नव्हते. आपण कुठे आलो आहोत. त्यामुळे काही सूज्ञ नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी उमेशला बाल सुधारगृहात दाखल केले.

akola police
हरवलेला उमेश भेटला दोन वर्षांनी; आई-वडीलांना अश्रू अनावर

By

Published : Feb 26, 2020, 6:41 PM IST

अकोला - हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन संगोपन करणाऱ्या शासकीय बाल न्याय मंडळ या संस्थेने दोन वर्षांआधी सापडलेल्या उमेशला बुधवारी त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. भावूक करणाऱ्या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

हरवलेला उमेश भेटला दोन वर्षांनी; आई-वडीलांना अश्रू अनावर

हेही वाचा -जागतिक श्रीमंताच्या यादीत सलग तिसऱ्यांदा जेफ बेझोस अव्वल; जाणून घ्या, मुकेश अंबानींचा क्रमांक

बुलडाणा जिल्ह्यात राहणारा उमेश दोन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता. त्याला काहीच कळत नव्हते. आपण कुठे आलो आहोत. त्यामुळे काही सूज्ञ नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी उमेशला बाल सुधारगृहात दाखल केले. तिथे तो दोन वर्षांपासून राहत होता. तेव्हापासून त्याच्या कुटुंबाचा बाल न्याय मंडळ शोध घेत होते. अखेर उमेशच्या आईवडिलांचा शोध लावण्यात बाल न्याय मंडळाला यश आले. त्यांनी त्याच्या पालकांना माहिती दिली. त्यानुसार ते बाल न्याय मंडळात आले. अधिकाऱ्यांनी एक छोटेखानी कार्यक्रम घेवून उमेशला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

भावुक प्रसंगी उमेश व त्यांच्या पालकांची भेट झाल्यानंतर त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. हा प्रसंग पाहताना उपस्थितांची डोळेही पाणावले. यावेळी महिला व बाल कल्याण मंडळाचे बाल संरक्षण अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख, बाल न्याय मंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा -कोरोनाची 'महामारी' झाल्यास जागतिक मंदीचे अरिष्ट येण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details