अकोला - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने आपल्या पत्नीचा खलबत्त्याने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी आलेगाव येथील गोरक्षण संस्थान येथे घडली. घटनेनंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी पतीला उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. जिजा मनोहर मेटांगे असे मृत महिलेचे नाव असून मनोहर भिका मेटांगे असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. या दोघांना दोन मुले आहेत.
धक्कादायक! खलबत्त्याने ठेचून पत्नीचा खून; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न - अकोला गुन्हेवार्ता
मेहकर तालुक्यातील जनुना येथील एक कुटुंब आलेगाव येथील गोरक्षण संस्थेमध्ये वास्तव्यास होते. मनोहर मेटांगे यांचे पत्नी जिजा हिच्यासोबत नेहमी वाद होत असत.
मेहकर तालुक्यातील जनुना येथील एक कुटुंब आलेगाव येथील गोरक्षण संस्थेमध्ये वास्तव्यास होते. मनोहर मेटांगे यांचे पत्नी जिजा हिच्यासोबत नेहमी वाद होत असत. तो पत्नीवर नेहमी संशय घेत होता. याच कारणातून त्याने रात्री पत्नीवर झोपेतच खलबत्त्याने वार करून तिचा खून केला. त्यानंतर त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी त्याची आठ वर्षाची मुलगी झोपेतून उठल्यावर तिने हा सर्व प्रकार पाहिला. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. आठ वर्षांच्या मुलीसह दोन वर्षांच्या मुलाला त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी चांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंके, ठाणेदार गणेश वनारे, पोलीस उपनिरीक्षक रामराव राठोड, गजानन पोटे, देवेंद्र चव्हाण यांच्यासह आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. याप्रकरणी जखमी अवस्थेत असलेल्या पतीला पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.