महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात जिल्हा परिषदेसाठी उद्या मतदान, निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - zolha parishad electiom akola

अकोला जिल्हा परिषद निवडणूक ७ जानेवारीला होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक ती निवडणुकीची कामे पूर्ण केली आहेत.

akola
अकोल्यात जिल्हा परिषदेसाठी उद्या मतदान, निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

By

Published : Jan 6, 2020, 3:20 PM IST

अकोला - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारीथंडावल्या. याठिकाणी ७ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानुसार मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे वाटप करून मतदान केंद्रावर पाठविण्यात आले. जिल्हा परिषदेला २७७, तर पंचायत समितीसाठी ४९२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १ हजार १९ मतदान केंद्रावर मतदान होणार असून ८ लाख ४६ हजार ५७ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

अकोल्यात जिल्हा परिषदेसाठी उद्या मतदान, निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

हेही वाचा -अकोल्यात साडेसहा लाखांच्या दारुसह मुद्देमाल जप्त; विशेष पथकाची कारवाई

जिल्हा परिषद निवडणूक ७ जानेवारीला होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक ती निवडणुकीची संपूर्ण कामे पूर्ण केली आहेत. त्यामध्ये ईव्हीएम मशीन सील करणे, त्यांची क्रमवारी लावणे, मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासारखी कामे निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे. अकोला तालुक्यात १९४ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात एक हजार १९ मतदान केंद्र आहे. ८ लाख ४६ हजार ५७ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. ८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषदेवर आपला झेंडा कायम राखेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details