महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदित्य ठाकरे यांच्या सवांद यात्रेला 15 हजार विद्यार्थी राहणार हजर - आमदार बाजोरिया - shivsena

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विद्यार्थी सवांद कार्यक्रम होणार आहे.

आदित्य ठाकरे

By

Published : Aug 25, 2019, 3:13 PM IST

अकोला - युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे २८ ऑगस्टला अकोल्यात येणार असून कृषी विद्यापीठाच्या सभागृहात त्यांचा कार्यक्रम होणार आहे. या सवांद कार्यक्रमात १५ हजार विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आज सांगितले. ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या सवांद यात्रेला 15 हजार विद्यार्थी राहणार हजर - आमदार बाजोरिया

बाजोरिया म्हणाले, ठाकरे सुरूवातीला मूर्तिजापूर येथे येणार आहेत. तिथे सत्कार झाल्यानंतर बोरगाव मंजू येथे स्वागत होईल. त्यानंतर ते मुक्काम करणार असून दुसऱ्या दिवशी ते बाळापूर येथील वाडेगाव विजय संकल्प मेळाव्यात उपस्थित राहतील. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विद्यार्थी सवांद कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते शेतकरी आणि पक्षाच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, सह सम्पर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, आमदार विपल्व्ह बाजोरिया, जिल्हा युवा सेनेचे प्रमुख विठठल सरप, महिला जिल्हा प्रमुख देवश्री ठाकरे, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवणीकर, अनिल गावंडे, डॉ. विनीत हिंगणकर, मुकेश मुरूमकार, संतोष अनासने, दिलीप बोचे, देविदास बोदडे, गोपाल दातकर, सह सम्पर्क प्रमुख वैशाली घोरपडे, संतोष अनासने यांच्यासह आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details