महाराष्ट्र

maharashtra

दोन हुंडी चिट्टी व्यावसायिकांवर कारवाई, जिल्हा उपनिबंधकांना पथकांच्या अहवालाची प्रतीक्षा

By

Published : Jan 31, 2020, 6:54 PM IST

अकोला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सावकारी आणि हुंडी चिट्टी व्यावसायिकांवर कारवाई केली होती. ही कारवाई झाल्यानंतर सुद्धा कारवाई केलेल्या पथकाने अहवाल सादर न केल्यामुळे पुढील प्रक्रीया थांबलेली आहे.

Action taken against two  businessmen for allegedly committing illegal lender
दोन हुंडी चिट्टी व्यावसायिकांवर कारवाई, जिल्हा उपनिबंकाना प्रतीक्षा पथकांच्या अहवालीची

अकोला - जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सावकारी आणि हुंडी चिट्टी व्यावसायिकांवर कारवाई केली होती. ही कारवाई संतोष राठी व राजेश राठी यांच्यावर करण्यात आली. या कारवाईत ३५ लाख रोख, ४५० धनादेश व खरेदीची कागपत्रे सापडली आहेत. ही कारवाई तीन पथकांनी केली होती. या पथकांचा अहवाल जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्याकडे अद्यापही प्राप्त झालेला नाही. यामुळे पुढील कारवाई थांबलेली आहे.

शहरातील दोन व्यापारी तसेच हुंडीचिठ्ठी दलाल यांच्या अवैध सावकारीच्या तक्रारी सहकार विभागाकडे झाल्यानंतर विभागाच्या तीन पथकांनी संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनशामदास राठी यांच्या निवासस्थानी छापे मारुन तब्बल ३४ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या दोन ठिकाणावरुन ४५० पेक्षा अधिक धनादेश जप्त करण्यात आले आहेत.

दोन हुंडी चिट्टी व्यावसायिकांवर कारवाई, जिल्हा उपनिबंकाना प्रतीक्षा पथकांच्या अहवालीची

हेही वाचा -अकोल्यातील साखळी उपोषणाची सांगता; 45 आंदोलनकर्त्यांची पोलीस कोठडीत रवानगी

या तीन पथकानी छापा मारून संतोष राठी यांच्या राजस्थान भवन येथील कार्यालयातून व राजराजेश्वर हाउसिंग सोसायटीतून २४ लाख ९४ हजार ६९७ रुपये रोख ८९ धनादेश जप्त केले. राजेश घनशामदास राठी यांच्या रामनगर येथील घरातून ८ लाख ३४ हजार ५०५ रुपये रोख ३४१ धनादेश आणि काही खरेदी खते ही जप्त करण्यात आली आहेत. या दोन्ही राठींकडे धनादेश, चिट्ट्या, संगणक आढळले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४,कलम १६ अन्वये जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात एस. डब्ल्यू. खाडे, एम. एस. गवई, एस. पी. पोहरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा - 'या' मागण्यांसाठी अकोल्यात पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन

या कारवाईला दहा दिवसांच्या वर वेळ गेला असला तरी या तीन पथकानी ही कारवाई केली. या पथकांकडून अजूनपर्यंत जिल्हा अपनिबंधक प्रवीण लोखंडे यांच्याकडे त्यांनी अहवाल सादर केला गेलेला नाही. त्यामुळे या कारवाईमध्ये आणखीन किती व्यापाऱ्यांचा सहभाग आहे, याचे स्पष्टीकरण झालेले नाहीत. या कारवाईच्या अहवालानुसार जे गुन्हे दाखल करायचे होते, ती प्रक्रिया लांबलेली आहे. या कारवाईमध्ये पथाकाकडूनच काही गौडबंगाल केले जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात केव्हा गुन्हे दाखल होतील, असा प्रश्न उपस्थित केला जाते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details