अकोला - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा पदग्रहण सोहळा शनिवारी जिल्हा परिषद प्राणांगणात पार पडला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड यावेळी पारंपरिक बंजारा वेशभूषेत आल्या होत्या. यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोला जि. प. पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात; अंजली आंबेडकर यांची विशेष उपस्थिती - अकोला जिल्हा परिषद
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रदीप प्रतिभा भोजने आणि उपाध्यक्षपदी सावित्रीबाई राठोड यांची निवड केली. समाज कल्याण विभागाच्या सभापतीपदाचा आकाश शिरसाट आणि महिला बाल कल्याण विभागाच्या सभापतीपदाचा मनीषा बोर्डे यांनी पदभार स्वीकारला.
हेही वाचा -दोन हुंडी चिट्टी व्यावसायिकांवर कारवाई, जिल्हा उपनिबंधकांना पथकांच्या अहवालाची प्रतीक्षा
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रदीप प्रतिभा भोजने आणि उपाध्यक्षपदी सावित्रीबाई राठोड यांची निवड केली. समाज कल्याण विभागाच्या सभापतीपदाचा आकाश शिरसाट आणि महिला बाल कल्याण विभागाच्या सभापतीपदाचा मनीषा बोर्डे यांनी पदभार स्वीकारला. तर विषय समिती सभापती पदाची पंजाबराव वडाळा, चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी जबाबदारी स्वीकारली. या पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमासाठी अंजलीताई आंबेडकर आणि वंचीत बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार प्रकट करीत गरजवंताला योजना आणि त्यांच्या सेवेसाठी पदाधिकाऱ्यांनी तत्पर राहण्याचे आवाहन केले. यावेळी भारिप आणि वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.