अकोला - अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील पातूर घाटात दुचाकी स्लिप होऊन रस्त्यावर फेकल्या गेलेल्या दोन भावांना ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात या दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीहून पडलेल्या दोन सख्या भावांना ट्रकने चिरडले - National Highway
अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील पातूर घाटात रस्त्यावर सांडलेल्या डिझेलमुळे त्यांची दुचाकी स्लिप झाली आणि दोघे भाऊ रस्त्यावर फेकले गेले आणि मागून येणाऱया ट्रकने त्यांना चिरडले. या दोन्ही सख्ख्या भावाच्या, अशाप्रकारे झालेल्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
सुनील शालीकराम चव्हाण (वय.३४), माणिक शालीकराम चव्हाण (वय.३२) अशी मृत्यू पावलेल्या दोन्ही भवांची नावे आहेत. ते मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील रहिवासी होते. ते दुचाकीने अकोला येथे रुग्णालयात जात होते.