अकोला - शहरातील अकोट रस्त्यावर असलेल्या देवरी फाटा येथे बोलेरो पिकअप आणि एका खाजगी बसाचा अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अपघातानंतर वाहतूक कोंडीही झाली होती.
अकोला-अकोट रस्त्यावर दोन वाहनांमध्ये अपघात; सहा जखमी हेही वाचा -रायगडमध्ये एकाला कोरोनाची लागन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क
बोलेरो पिकअप गाडी (क्र. एमएच 30 बीडी 2647) व खासगी बस (क्र. एमपी 48 पी 0194) यांची देवरी फाटा येथे धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगजेब, गुलाम दसरी, चालक सुधाकर राठोड, स्वराज अजय पावडे यांच्यासह इतर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर तेथील नागरिकांनी धावपळ करीत दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच फसलेली दोन्ही वाहने बाजूला करून झालेली वाहतूक कोंडी दूर केली. यावेळी पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. तसेच याबाबत पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -कोकणासाठी ग्रीनफील्ड महामार्गाची राज्य सरकारची घोषणा