अकोला - रिक्षा आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली आहे. या घटनेनंतर चारचाकी वाहनाचा चालक गाडीसह पसार झाला. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून उपस्थित नागरिकांनी जखमींना दुचाकीवर सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा अपघात; जखमींना दुचाकीवर नेले रुग्णालयात - अकोला अपघात न्यूज
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रवेश द्वाराजवळ रिक्षा आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षातील प्रवासी जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी जखमींना दुचाकीवर सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
![रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा अपघात; जखमींना दुचाकीवर नेले रुग्णालयात Accident between Auto and four wheeler](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6096861-thumbnail-3x2-auto.jpg)
रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा अपघात
रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा अपघात
हेही वाचा -थोडक्यात जीव बचावला; लोकल पकडण्यासाठी तरुणाचा धोकादायक प्रवास
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रवेश द्वाराजवळ रविवारी दुपारी हा अपघात घडला. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मात्र, पोलीस आणि रुग्णवाहिका दोन्हीही वेळेवर हजर झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी रिक्षातील जखमींना स्वत:च रुग्णालयात नेले. पोलीस वेळेवर आले नाहीत म्हणून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघातानंतर विद्यापीठासमोर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.