अकोला- जिल्हा उपनिबंधक व सहायक आयुक्त यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी आज अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. यामध्ये किती रुपये घेतले आणि कोणत्या प्रकरणात घेतले हे अद्याप एसीबीकडून कळू शकले नाही. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे व जीएसटी सहायक आयुक्त अमरप्रीत सेठी असे लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
जीएसटीचे सहायक आयुक्त, जिल्हा उपनिबंधकावर एसीबीची कारवाई; जिल्ह्यात खळबळ - अकोला गुन्हे बातमी
लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक व जीएसटीच्या सहायक आयुक्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज कारवाई केली. या दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. यामध्ये किती रुपये घेतले आणि कोणत्या प्रकरणात घेतले हे अद्याप एसीबीकडून कळू शकले नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे व जीएसटी सहायक आयुक्त अमरप्रीत सेठी या दोघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही एका प्रकरणात पैसे घेतल्याचे एसीबीच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. एसीबीने हे प्रकरण नेमके काय आहे, किती रुपये घेतले, याबाबत त्यांनी खुलासा केला नाही. कारवाई अजून सुरू असल्याची एसीबीचे उपाधीक्षक एस. एस. मेमाणे यांनी सांगितले.