महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Akola Crime : धक्कादायक! बाळापूर तालुक्यात १५ वर्षीय मुलीवर अत्याचार - Abused on girl

अकोला जिल्यातील बाळापूर तालुक्यातील शेळाद येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abused on 15 year old girl) करुन नात्यातील काका, मावसभाऊ व अन्य एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा पोलिस तपास करत आहेत. (Akola Crime)

Akola Crime
मुलीवर अत्याचार

By

Published : Jan 9, 2023, 8:05 PM IST

अकोला : नात्याला काळीमा फासणारी घटना बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abused on 15 year old girl) करुन काका व मावसभाऊ व अन्य एक अशा तिघांनी नात्याला काळिमा फासली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यामध्ये तिघांना अटक केली आहे.(Akola Crime)

मुलीवर अत्याचार : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच असल्याचे पाहुन तिचा काका, मावसभाऊ तसेच गावातील ज्ञानेश्वर उर्फ लाल्या बंडु शेळके यांनी त्या मुलीशी शारिरीक संबंध प्रस्तापीत करुन अत्याचार (Abused on girl) केला. अल्पवयीन मुलीचा घरात कुणीही नसल्याचे पाहुन वेगवेगळ्या बहाण्याने तिघांनी वेगवेगळ्या वेळी प्रवेश करुन अल्पवयीन मूलीवर अत्याचार केले.

आरोपींना अटक : या प्रकरणी पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादिनुसार बाळापूर पोलीसांनी भादवी कलम ३७६, ३७६ अ (ए), ३७८ (3), ३५४, ३५४ (ए), ५०६, ३४ तसेच अनुसुचित जाती जमाती अधिनियमन सहकलम ३, ४, ५, ६, ७, ८ पोटकलम ३ (२) अन्वये तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद घुईकर यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव हे पुढील तपास करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details