अकोला- पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. आवडीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्या विषयी ओळख व माहिती व्हावी याकरीता कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने सोमवारी प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या 'रानमेवा महोत्सव' आर.डी.जी. महिला कॉलेजसमोर आयोजीत करण्यात येणार आहे.
'आत्मा'कडून श्रावणातील स्पेशल रानभाजी महोत्सव - akola latest rain news
शहरातील नागरिकांना शेतकरी गटाच्या माध्यमातून रानभाज्यांचे विक्री सुध्दा केली जाणार आहे. यावेळी रानातील मेवा म्हणून अंबाडी, चिवळी, केना, शेवगा, सुरण, करवंद, आघाडा, टरोटा, पिंपळ, भूई आवळा, करटोली, राजगुरा, वाघाटे, फांदीची भाजी, कुंजीर भाजी, चमकुराचे पाने, काटसावर, जिवतीचे फुलं व इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध असणार आहेत.

याकरता प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहात तालुका कृषी अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, पंचायत समिती कृषी अधिकारी, कार्यालीन कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत होणार आहे.