महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिनी वस्तुंच्या मालाची होळी करुन 'आप'ने वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली - india china border dispute

आम आदमी पक्षाने अकोला शहरात चिनी मालाची होळी केली. चीन विरोधात घोषणा देत, भारत-चीन सीमेवर वीरगतीस प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

Holi of Chinese goods in akola city
अकोला शहरात आपने चिनी वस्तुंच्या मालाची होळी करच हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली

By

Published : Jun 17, 2020, 5:29 PM IST

अकोला - शहरातील आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी नेहरू पार्क चौकातील शहीद स्मारकासमोर भारत-चीन सीमावादात हुतात्मा झालेल्या जवानांनी श्रद्धांजली अर्पण केली. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर असलेल्या गलवान खोरे येथे दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी चिनी वस्तुंची होळी करत चीन विरोधात घोषणा दिल्या.

अकोला शहरात आपने चिनी वस्तुंच्या मालाची होळी करच हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली

हेही वाचा...भारत-चीन संघर्ष: राजधानीमध्ये हालचालींना वेग; संरक्षण मंत्र्यांची तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक

भारताच्या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम आदमी पक्षाच्या शहर पदाधिकार्‍यांनी नेहरू पार्क चौक येथे एकत्र येत जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच जो देश आपल्या देशाशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत आहे. अशा देशातील वस्तूंवर बहिष्कार करून त्याला धडा शिकवला पाहिजे. याच उद्देशाने आपच्या पदाधिकाऱ्यांनी चिनी वस्तूंचा बहिष्कार करून त्या वस्तू जाळल्या. तसेच चीन विरोधात नारेबाजी केली. या आंदोलनात आपचे संदीप जोशी जोशी, ठाकूरदास चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा...'भारत-चीन सीमावाद तातडीने सोडवा, नाहीतर...'

ABOUT THE AUTHOR

...view details