महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे 40 आमदारांना 'हे' खुले आव्हान - आदित्य ठाकरेंचे 40 आमदारांना खुले आव्हान

या जनतेने जर तुम्हाला गद्दार म्हणून नाही तर राज्यकर्ता म्हणून स्वीकारले असेल तर माझे चॅलेंज आहे तुमच्या सर्व 40 आमदारांना, मी राजीनामा देतो, तुम्ही ही राजीनामा द्या, असे खुले आवाहन देत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिले आहे. (Aaditya Thackeray challenge to 40 mla)

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

By

Published : Nov 7, 2022, 8:58 PM IST

अकोला: या जनतेने जर तुम्हाला गद्दार म्हणून नाही तर राज्यकर्ता म्हणून स्वीकारले असेल तर माझे चॅलेंज आहे तुमच्या सर्व 40 आमदारांना, मी राजीनामा देतो, तुम्ही ही राजीनामा द्या, असे खुले आवाहन देत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिले आहे. (Aaditya Thackeray challenge to 40 mla). ते अकोल्यातील बाळापूर येथे संवाद यात्रेत बोलत होते.

आदित्य ठाकरे

हे सरकार कोसळणारच: राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं, मात्र यामध्ये खरा मुख्यमंत्री कोण हे समजतच नाही आहे. हे सरकार कोसळणारच, असा दावा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी केला आहे. आमच्या चेहऱ्यावर लपवण्यासारखे काही नाही, पण मुख्यमंत्री गद्दारीचा शिक्का माथ्थ्यावर घेऊन फिरताय, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. दरम्यान, सध्या राजकीय फटाके खूप फोडले जात आहेत, आमदारांना लग्नात गेले की लोक खोक्याचा हिशोब मागतात असा टोला बच्चू कडूंना लगावला आहे. आज अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत, विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, वरुन सरदेसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकरसह आदी शिवसेने नेते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे

मध्यवर्ती निवडणुकीसाठी सज्ज रहा: दरम्यान, आता कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनी मध्यवर्ती निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी अकोल्यात जाहिर सभेत केले आहे. महाविकास आघाडीने दिलेली वचने पूर्ण करून दाखवली होती. या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केले का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी सभेत उपस्थित केला आहे. आमदार नितीन देशमुख हे सुरतवरुन गुवाहटीला गेले नाही. ज्यांच्यात हिंमत नव्हती ते गुवाहटीला पळून गेले, असा टोला आदित्य ठाकरेंनी ४० आमदारांना लगावला आहे. आज हे ४० गद्दार डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असताना या सरकारने काय दिले, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. आमचे सरकार असते तर आत्तापर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला असता, असे म्हणताना तर उद्योग मंत्री काय उद्योग करतात, असा घणाघाती टोला आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे

आमदार देशमुख यांनी दिली मिठी:गद्दारांच्या सोबत न जाता पक्षासोबत एकनिष्ठ राहून पक्षात इमानदार शिवसैनिक आहेत हे आमदार नितीन देशमुख यांनी दाखविले आहे. म्हणून मी त्यांना या सभेत मिठी मारतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी देशमुख यांना मिठी मारली.

लग्नातही लोक खोक्याचा हिशोब मागतात: सध्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे नेते खुर्च्या सोडायला तयार नाहीत. ओला दुष्काळ जाहीर करावा नाही तर खुर्च्या खाली कराव्या, ही मागणी आम्ही कायम असणार आहे. पण हे आमदार लग्नात गेले की लोक खोक्याचा हिशोब मागतात, अशी टीका रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यावर केली आहे. तर राज्यात बंटी आणि बबली खूप झाले आहेत, असा टोला ही राणांना लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details