अकोला - अकोल्यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकही रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आलेला नाही. 68 अहवालांमधून हा निकाल समोर आला आहे. ही बातमी दिलासादायक असली तरी सायंकाळी येणाऱ्या अहवालातून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे आज एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या आठ दिवसांपासून दररोज वाढत असून आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यामध्ये एका महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू - akola covid 19 cases
आज एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या आठ दिवसांपासून दररोज वाढत असून आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, 15 जून रोजी रात्री उपचार घेताना एक 50 वर्षीय महिला मृत झाली. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून, 13 जून रोजी दाखल झाली होती. मृतांमध्ये वृद्धांचा समावेश आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली मृतांची संख्या ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षा ही चिंताजनक ठरत आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मात्र याबाबत माहिती देण्यात येत नसल्याची स्थिती आहे.
प्राप्त अहवाल-68
पॉझिटीव्ह-00
निगेटीव्ह-68
आता सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 1041
मृत- 54 (53+1),
डिस्चार्ज - 658
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 329