अकोला - दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. हा साप सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी अनेक जण या सापाचा शोध घेण्यासाठी जंगलात फिरत असतात. मात्र, अकोल्यातील गोरक्षण रोड येथे हा साप आज पहाटे सहजच मिळून आला. मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांना हा साप दिसला. त्यांनी हा साप मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्या स्वाधीन केला. त्यामुळे, या अनन्यसाधारण सापाला जीवदान मिळाले. तर त्याच्या तस्करीचा प्रयत्नही फसला.
हेही वाचा -India Book of Record : परीधीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद
हा साप दुर्मिळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या सापाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. हा साप दुर्मिळ असल्यामुळे तो सहजासहजी मिळत नाही. मात्र, शहरातील गोरक्षण रोडवरील चार बंगल्याजवळ हा साप पहाटे रेंगाळत असताना मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांना दिसला. त्यांनी या सापाबद्दल पाहून कुतूहल व्यक्त केले. हा साप अति दुर्मिळ असल्यामुळे त्यांनी लगेच मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना या सापाची माहिती दिली. बाळ काळणे यांनी तातडीने येऊन तो साप ताब्यात घेतला. त्यानंतर हा साप त्यांनी जंगलात सोडून दिला.
हा साप जर तस्करांच्या निदर्शनास आला असता तर या सापाची कोट्यवधी रुपयांच्या घरात विक्री झाली असती. अकोला पोलिसांनी साप तस्करांना बऱ्याच वेळा पकडले आहे. त्यांच्याकडून मांडूळ जातीचा हा दुर्मिळ साप जप्त केलेला आहे. त्यामुळे, या सापाचे अधिक महत्त्व आहे. दरम्यान, या सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्यामुळे तस्करांच्या तावडीतून हा साप सुरक्षित सोडविण्यात मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना यश आले, हे मात्र निश्चित.
मांडूळ सापाची वैशिष्ट्ये
- हा साप दोन तोंडी आहे.