अकोला- एमआयडीसी परिसरातील भारत ऑइल इंडस्ट्रीजला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या आठ बंब'च्या सहाय्याने आग विझवण्यात आली. या आगीत कोणीही जखमी झाले नसून ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.
अकोल्यात भारत ऑइल इंडस्ट्रीजच्या गोदामाला भीषण आग
अकोल्यात एमआयडीसी परिसरातील भारत ऑइल इंडस्ट्रीजला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
एमआयडीसीमधील बिलाल इंद्रिस मुन्शी यांच्या भारत ऑइल इंडस्ट्रीजच्या गोदामातून सकाळी धूर निघत होता. थोड्यावेळाने आगीचे डोंब दिसायला लागले. तिथे असलेल्या मजुरांना आग लागल्याचे समजताच त्यांनी आग विझविण्यासाठी धावपळ सुरू केली. इंडस्ट्री चे मालक आणि अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
मजुरांनी गोदामातील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यांनतर अग्निशमन दलाने येताच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोक्याट प्रयत्न केले. आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.