महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fake IB Officer Raid : शिवसेनेच्या माजी आमदाराच्या घरी आयबीच्या बनावट अधिकाऱ्याने टाकला छापा.. बिंग फुटल्याने पोलिसांत तक्रार - शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

एकीकडे राज्यभरात शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्यात येत असताना अकोल्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बनावट आयबी अधिकाऱ्याने शिवसेनेच्या माजी आमदाराच्या घरी ( Shivsena Ex MLA Gopikishan Bajoria ) जात 'रेड' मारली ( Fake IB Officer Raid ) . मात्र, त्याचे बिंग फुटल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या माजी आमदाराच्या घरी आयबीच्या बनावट अधिकाऱ्याने मारली 'रेड'.. बिंग फुटल्याने केली पोलिस तक्रार
शिवसेनेच्या माजी आमदाराच्या घरी आयबीच्या बनावट अधिकाऱ्याने मारली 'रेड'.. बिंग फुटल्याने केली पोलिस तक्रार

By

Published : Apr 2, 2022, 7:49 PM IST

अकोला - अकोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया ( Shivsena Ex MLA Gopikishan Bajoria ) यांच्या बंगल्यात एक व्यक्ती कार घेवून आली. आपण आयबीकडून आलो असल्याचे सांगत या व्यक्तीने वाहनांची व घराच्या कागदपत्रांची माहिती मागण्यास सुरुवात ( Fake IB Officer Raid ) केली. मात्र, हा व्यक्ती बनावट अधिकारी असल्याचे लक्षातच येताच या प्रकरणी खदान पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. परंतु, या घटनेने एकच खळबळ उडाली. राजकीय कटकारस्थानमधून हा प्रकार झाल्याची चर्चा सुरू झाली.

असा झाला प्रकार : अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा बंगला आहे. याच बंगल्यात एक कार अचानकपणे पहिल्या माळ्यावरील पार्कींगमध्ये थेट आत गेली. कारचा क्रमांक एमएच 04 एफयू 0919 आहे. याच कारमधून एक व्यक्ती उतरून थेट माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांच्या बंगल्याच्या समोरील बाकावर जावून बसतो. त्याला पाहून यश अश्विनकुमार बाजोरिया यांना संशय येतो. त्यानंतर यश आणि त्यांचे काका संजय बाजोरीया व सुनील बाजोरीया त्याचे जवळ जातात. त्याची विचारपूस करतात. त्यावर तो आपण आयबीचा माणूस आहे असे सांगून सर्व गाड्यांची कागदपत्रे तसेच चाव्या मागतो. मात्र, त्याचवेळी येथे उपस्थित असलेले आमदार बाजोरिया यांच्या नातवासोबत वाद घालण्यास सुरुवात करतो.

शिवसेनेच्या माजी आमदाराच्या घरी आयबीच्या बनावट अधिकाऱ्याने टाकला छापा.. बिंग फुटल्याने पोलिसांत तक्रार

वाहनांचे छायाचित्र काढण्याचा छंद : दरम्यान, दमदाटी करून तो व्यक्ती दोन गाड्यांची चावीही घेतो. त्यानंतर घराचे कागदपत्र मागू लागतो. त्याचा संशय आल्याने यश आणि त्यांचे काका त्याला ओळखपत्र मागतात. मात्र सदर व्यक्ती ओळखपत्र देण्यास नकार देतो. त्या व्यक्तीचे नाव प्रतिक संजयकुमार गावंडे असल्याचे लक्षात आले. तरीही हा व्यक्ती घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागतो. हा सगळा प्रकार अकोल्यातील माजी आमदार बाजोरिया यांच्या घरी घडला आहे. दरम्यान त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने जबरदस्ती करत शिविगाळ केली व पाहून घेतो, अशी धमकी दिली. तो बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला बंगल्याबाहेर काढून खदान पोलिसात तक्रार दिली.यश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रतिक संजयकुमार गावंडे याच्याविरुद्ध भांदविचे कलम 452, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या आरोपी प्रतिक संजयकुमार गावंडे याला वाहनांवर असलेल्या फॅन्सी व युनिक नंबरचे फोटो काढण्याचा छंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या वाहनांचे छायाचित्र काढण्यासाठी बंगल्यात जातो. आमदार बाजोरिया यांच्या बंगल्यातही तो यासाठीच गेला असावा, अशी माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details