महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मजुरांना घेऊन जाणारा कंटेनर पातुर घाटात उलटला; आठ जखमी - migrant workers accident

अकोला जिह्यातील पातुर घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटला. या अपघातात आठ मजूर जखमी झाली आहेत.

9 migrant workers injured container accident in akola district
मजुरांना घेऊन जाणारा कंटेनर पातुर घाटात उलटला; आठ जखमी

By

Published : May 23, 2020, 5:31 PM IST

अकोला- जिह्यातील पातुर घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातात आठ मजूर जखमी झाली आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, या जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२२) उशिरा रात्री घडली.

कंटेनर चेन्नई येथून (क्र. एमएच 04 सीजी 1026) उत्तर प्रदेशला निघाला होता. पातुर येथील घाटातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर घाटात उलटला. या अपघातामध्ये कंटेनरमध्ये असलेले आठ मजूर जखमी झाले. बंटी कुमार, कुमारी, मिनू, प्रभूदयाल, अनिल कुमार, राजेश कुमार, बनवारी, भारत, गुडिया असे जखमी झालेल्या मजूरांची नावे आहे. हे सर्व जण उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत.

मजुरांना घेऊन जाणारा कंटेनर पातुर घाटात उलटला...

मजूर चेन्नई येथे कामासाठी गेले होते. लॉकडाऊनमुळे कामे बंद पडली. त्यामुळे ते गावाकडे निघाले होते. मात्र, वाहन चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. दरम्यान, वाहन चालक झोपेत असल्याने, हा अपघात झाल्याची चर्चा आहे. अपघातानंतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पातुर पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे.

हेही वाचा -आनंददायी बातमी... अकोल्यातील दोन पोलिसांचा कोरोनावर विजय, अधिकाऱ्यांकडून दोघांचे स्वागत

हेही वाचा -अकोल्यात आज १४ कोरोनाबाधित आढळले; पातूरमधील एका रुग्णाचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details