महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात आठ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; मृत्यूनंतर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह

दोन रुग्ण मृत झाले आहेत. हे दोन्ही रुग्ण हे १९ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. त्यांचे अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

corona akola
corona akola

By

Published : May 22, 2020, 1:02 PM IST

अकोला- कोरोना रुग्णांचा अहवाल आज(शुक्रवार) सकाळी प्राप्त झाला आहे. या अहवालात आठ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर, दोघांचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला आहे. 15 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दोन रुग्ण मृत झाले आहेत. हे दोन्ही रुग्ण हे १९ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. त्यांचे अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून ती नायगाव येथील रहिवासी आहे. तर अन्य एक ५२ वर्षीय पुरुष असून तो बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे.

तसेच 21 मे रोजी रात्री १५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यातील पाच जणांना घरी तर दहा जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवले आहे. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मृत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जिल्हा परिषद शाळेतील अलगीकरण कक्षातच होती.

  1. आता सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३४९
  2. मृत-२३ (२२+१)
  3. डिस्चार्ज - २०६
  4. दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १२०

ABOUT THE AUTHOR

...view details