महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीच्या तोंडावर परराज्यातून आलेला 700 किलो खवा जप्त - अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मिठाई, फराळाची जोरदार सुरू आहे. या दिवाळीच्या तोंडावर अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येत असते. अशाच भेसळीसाठी राजस्थानहून येणारे तब्बल 700 किलो खवा अकोल्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे.

जप्त केलेला खवा

By

Published : Oct 16, 2019, 1:49 PM IST

अकोला- परराज्यातून आलेला १ लाख 19 हजार रुपयांचा 700 किलो खवा सिंधी कँप येथून मध्यरात्री जप्त केला. या कारवाईमुळे ऐन सणासुदीच्या काळात बनावट खव्याचा वापर करून त्याची मिठाई तयार करण्याच्या गोरखधंद्यावर प्रतिबंध लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सरसावला आहे.

बोलताना आयुक्त


अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांना गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी सिंधी कँम्प, पक्की खोली येथील गोविंदसिंग राजपुरोहित यांच्या घरातून परराज्यातून आलेला कुंदा (मीठा खवा) सुमारे 700 किलो किंमत १ लाख 19 हजार नमूना घेऊन जप्त करण्यात आला. हा मीठा खवा जिल्ह्यातील स्वीट मार्ट व्यवसायीकाकडून पेढा व ईतर मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येते. हा खवा राजस्थान येथून जुने वापरलेल्या तुटलेल्या गंजलेल्या टिन डब्यात आणण्यात आला. उत्पादन तारीख नमूद नसून अस्वच्छ वातावरणात वाहतूक व साठवणूक होत असल्याने कमी दर्जाचे असल्याचे संशयावरून जप्त करण्यात आला. सदर कारवाई सहायक आयुक्त राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा - मोदी लोकशाहीचे तर शाह शांतीचे हत्यारे; अकोल्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details