अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज सातने वाढ झाली. हे सातही रुग्ण पातूर येथील असून अकोल्यातील रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे. तसेच पातूर येथील 15 रुग्णांपैकी फक्त सात जणांचे अहवाल प्राप्त झाले असून इतर आठ जणांच्या अहवाल अद्याप मिळाले नसल्याने ही संख्या हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्रशासनाने पातुर शहर पूर्णपणे सील केले आहे.
अकोल्यात आणखी सात जण कोरोनाबाधित, रुग्णांचा आकडा नऊ - अकोला नवीन कोरोना रुग्ण
पातूर येथील 15 रुग्णांपैकी फक्त सात जणांचे अहवाल प्राप्त झाले असून इतर आठ जणांच्या अहवाल अद्याप मिळाले नसल्याने ही संख्या हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्रशासनाने पातुर शहर पूर्णपणे सील केले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. संख्या अचानक सातने वाढल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पातूर शहरातील पंधरा जणांना आयसोलेशन करण्यात आले होते. या सर्वांचे नमुने नागपूर येथे पाठवण्यात आले होते. त्यानुसार सात जणांचा अहवाल प्राप्त झाल्यावर हे सातही जण कोरोना पॉझिटिव निघाल्यामुळे अकोल्यातील कोरणा रुग्णांची संख्या आता नऊ वर पोहोचली आहे. दरम्यान, याआधी अकोला शहरातील दोन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह मिळाले होते. प्रशासनाकडून या दोन्ही रुग्णांच्या परिसरामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच आता पातुर शहरही प्रशासनाने सील केले आहे. तिथेही लवकरच आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पातूर येथील सातही रुग्ण हे मेडशी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यासोबतच इतर आठ लोकही त्याच व्यक्तीच्या संपर्कात असल्याने त्यांचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे ही संख्या आता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हे सातही रुग्ण इतर जिल्ह्यातही फिरून आले असल्याची माहिती आहे.