महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Paras Accident: अकोल्यात आरती सुरु असताना कोसळले झाड; भाविकांच्या मृतांचा आकडा ८वर पोहोचला! - भाविकांच्या मृतांचा आकडा ८वर पोहोचला

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथे असलेल्या बाबूजी महाराज संस्थानमध्ये रविवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात भक्त जमले होते. रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान सोसाट्याचा वारा आल्यामुळे येथील मंदिरावरील टीनवर झाड पडून टिनेखाली काही भक्त दबले गेले. सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील मृतांना शासनाकडून चार लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Paras Accident
भाविकांच्या मृतांचा आकडा ८वर पोहोचला

By

Published : Apr 10, 2023, 7:29 AM IST

Updated : Apr 10, 2023, 8:04 AM IST

अकोल्यात आरती सुरु असताना कोसळले झाड

अकोला:जिल्ह्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेले पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांमध्ये रविवारी सायंकाळी आरती सुरू होती. मंदिराच्या परिसरातील टिनाच्या शेड खाली दर्शनासाठी आणि पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील वाहन धारक, असे सर्व 45 पेक्षा जास्त लोक थांबले होते. अचानक कडुलिंबाचे झाड टिनाच्या शेडवर कोसळले. या घटनेत आतापर्यंत 7 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही लोकांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले. यातील काही लोकांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर जखमींचा आकडा 23 पेक्षा अधिक आहे. या सर्वावर जखमींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांनी दिली आहे.

सात जणांचा मृत्यू:अकोल्यातील पारस येथे रविवारी एक जुने झाड टिनशेडवर पडल्याने सात जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 29 जण जखमी झाले. अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सांगितले की, एक जुने झाड पडल्यावर शेडखाली जवळपास 40 लोक उपस्थित होते. त्यापैकी 36 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला होता, असे जिल्हाधिकारी अरोरा यांनी सांगितले होते. त्यानंतर मृतांची संख्या सात झाली. एक व्यक्ती गंभीर जखमी आहे.

पाच भाविक गंभीर जखमी: जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील पारस येथे शेड कोसळल्यामुळे एकच धावपळ सुरू झाली. त्यामध्ये सात भाविकांचा मृत्यु झाला तर 29 जण जखमी झाले. त्यापैकी पाच भाविक गंभीर जखमी आहेत. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. दरम्यान, जखमींना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मृतकांपैकी चार जणांची ओळख पटली आहे.

चार जणांची ओळख पटली: या घटनेतील सात मृत व्यक्तीं पैकी चार जणांची ओळख पटली आहे. यामध्ये उमा महेंद्र खारोडे (वय 50 वर्ष, मु.फेकरी, दिपनगर ता.भुसावळ जि.जळगांव), पार्वतीबाई महादेव सुशीर (वय 55 वर्ष,मु.भालेगांव बाजार ता.खामगांव जि.बुलडाणा), अतुल श्रीराम आसरे (वय 35 वर्ष , मु. बाभुळगांव ता.अकोला), मुरलीधर बळवंत अंबारखाने (वय 55 वर्ष, मु. पारस ता.बाळापुर जि. अकोला) यांचा समावेश आहे. तर इतर तीन मृत्यू व्यक्तींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भाविकांना चार लाख रुपये मदत: महसूल अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी जखमींची विचारपूस केली. जखमींना गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा जातीने या घटनेकडे लक्ष देऊन आहे. दरम्यान, सर्व जखमींवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करण्यात येत आहे. जखमींपैकी काही हे गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहे. तर मृत्यू आणि जखमींना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मृतकाना चार लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तर 60 टक्के पेक्षा जास्त जखमी असलेल्या भाविकांना अडीच लाख आणि त्यापेक्षा कमी जखमी असलेल्या भाविकांना 74 हजार रुपये मदत प्रशासनाने जाहीर केली आहे.

फडणवीस यांची ट्विटरवर आदरांजली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत काही भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पारस येथे आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, अकोला जिल्ह्यातील पारस येथे धार्मिक कार्यक्रमासाठी काही लोक जमले असताना टिन शेडवर झाड पडून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी वेदनादायी आहे. मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो, असे त्यांनी ट्विट केले.

हेही वाचा: Tree Falling On Temple मंदिरावरील पत्र्यावर कोसळले झाड 7 भाविकांचा मृत्यू

Last Updated : Apr 10, 2023, 8:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details