अकोला -अकोल्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या कोरोना रुग्ण तपासणी अहवालात दहा जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. सकाळी सापडलेले ४९ व सायंकाळचे रुग्ण मिळून दिवसभरात आज एकूण ५९ रुग्ण सापडले आहेत. त्यासोबतच २० जणांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
अकोल्यात शुक्रवारी ५९ कोरोना रुग्णांची भर.. तर २० जण कोरोनामुक्त - अकोला जिल्हा कोरोना अपडेट
प्राप्त अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एका दोन महिने वयाच्या बालिकेसह ९ महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
प्राप्त अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एका दोन महिने वयाच्या बालिकेसह ९ महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यातील पाच जण हे अंतरीरंगा बाळापुर येथील रहिवासी आहेत. उर्वरीत बाळापुर, सिंदखेड ता. बार्शी टाकळी, विजयनगर, हमजा प्लॉट, चैतन्य नगर येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, दुपारनंतर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात ११ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित ९ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
प्राप्त अहवाल-१९०
पॉझिटीव्ह-५९
निगेटीव्ह-१३१
आता सद्यस्थिती-
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९७३
मयत-४४ (४३+१)
डिस्चार्ज-६०६
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह)-३२३