अकोला - आज प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालांमध्ये २३ जण, तर काल रात्री रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये 32 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. तसेच दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व १८ पुरुष आहेत. त्यातील नऊ जण सेंट्रल जेल येथील, तीन जण पळसोबढे येथील, दोन जण सिंदखेड येथील, बोरगाव मंजू, हैदरपुरा खदान, मुर्तिजापूर, रामनगर, पातूर, सरस्वती नगर, नित्यानंद नगर, जीएमसी व सेवरा अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्येत व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात ५२ वर्षीय महिला असून ती आमीनपुरा अकोट येथील रहिवासी आहे. ती २० जुलैला दाखल झाली होती. उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. तसेच दुसरी ५० वर्षीय महिला असून, ती बोरगाव मंजू येथील रहिवासी आहे. ती ७ जुलैला दाखल झाली होती.
सकाळी प्राप्त अहवालानुसार -
अकोल्यात कोरोनाचे 55 नवे रुग्ण, तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू - अकोला कोरोना अपडेट
गुरुवारी प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालांमध्ये २३ जण, तर काल रात्री रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये 32 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. तसेच दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अकोल्यात 55 जण सापडले पॉझिटिव्ह तर दोन कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
अहवाल संख्या - १७६
पॉझिटिव्ह - २३
निगेटिव्ह - १५३
कोरोनाची सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - २३०१
मृतांची संख्या - १०६
डिस्चार्ज - १७९८
सक्रिय रुग्णांची संख्या -३९७