अकोला - गोरक्षण रस्त्यावर गस्त घालणाऱ्या खदान पोलिसांनी एका कारची झडती घेतली असता, चारचाकी वाहनातून मांसाची वाहतूक होत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला. पोलिसांनी यामध्ये कार चालक अब्दुल अतिक अब्दुल रफिक यास अटक केली आहे. हे मांस मूर्तीजापूर येथून आणून जिल्हाभरात ठिकठिकाणी पोहोचविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
चारचाकी वाहनातून मांसाची वाहतूक; 500 किलो मांस जप्त - arrest
मूर्तीजापूर शहरातील कसाबपुरा येथे गुरांची कत्तल करून त्याचे मांस जिल्हाभरात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना होती. परंतु, त्यासंदर्भात कुठलाच सुगावा पोलिसांकडे नव्हता.
मूर्तीजापूर शहरातील कसाबपुरा येथे गुरांची कत्तल करून त्याचे मांस जिल्हाभरात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना होती. परंतु, त्यासंदर्भात कुठलाच सुगावा पोलिसांकडे नव्हता. निवडणुकीनिमित्त या ठिकाणी चेक पॉईंट आणि गस्तीवर असलेले पोलीस वाहनांची तपासणी करीत आहेत. तसेच संशयित असलेल्या वाहनांना थांबून त्यांची कागदपत्रेही तपासण्यात येत आहेत. खदान पोलिसांनी गोरक्षण रोडवर एमएच १७ व्ही २७९ क्रमाकांचे चारचाकी वाहन अडविले. त्याची तपासणी केली असता, तब्बल ५०० किलो मांस आढळून आले.
याप्रकरणी वाहन चालक अब्दुल अतीक अब्दुल रफीक यास अटक केली असून वाहनही जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरात नव्हे तर जिल्ह्यात छुपा पद्धतीने मांस घरोघरी पोहोचविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे मांस नेमके गोमास आहे किंवा नाही यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.