अकोला- सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अकोल्यात चार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. १०८ अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील १०४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील बाधित व्यक्तींची एकूण संख्या २६१ झाली आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे दिवसाअखेर प्रत्यक्षात १२२ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
अकोल्यात चार जणांची कोरोनावर मात; आतापर्यंत 121 जणांना उपचारानंतर सोडले घरी - कोरोना अकोला
अकोल्यात सोमवारी चार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर चार रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान चार जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. हे चारही रुग्ण राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. यातील एक रुग्ण ७ तर अन्य तिघे ८ रोजी दाखल झाले होते. त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळाली आहे.
आता सद्यस्थितीत २६१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील १८ जण (एक आत्महत्या व १७ कोरोनामुळे) मृत आहेत. १८ मे रोजी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२१ झाली आहे. तर सद्यस्थितीत १२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.