अकोला- अकोट व तेल्हारा तालुक्यात वीज पडून एकूण 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अकोट तालुक्यात विजेच्या गडगडाटसह पाऊस सुरु होता. त्यावेळी लाडेगाव शेतशिवारात वीज कोसळली. यामध्ये बेलूरा येथील 55 वर्षीय शेतमजूर दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - कापड दुकानात शिरला कोल्हा, वन विभागाच्या पथकाने केले जेरबंद
तर दुसऱ्या घटनेमध्ये तेल्हारा तालुक्यातील तिघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यामध्ये गणेश मोकळकार (वय-60 रा. भोकर) गजानन अढाऊ(वय - 27 रा. वरुड) लक्ष्मी नागोराव अढाऊ (वय - 12) वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी