अकोला- वाडेगाव येथील अनुसूचित जाती जमातीच्या ३१० कुटुंबांना विशेष बाब म्हणून घरकूल मंजूर झाले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. मात्र, यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने घरकूल योजनेस पात्र असलेल्या कुंटुंबांनी आज जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकरी यांच्या कक्षात धडक दिली आणि घरकूल योजनेच्या अमलबजावणीची मागणी केली.
अनुसूचित जाती जमातीच्या ३१० कुटुंबांचा मोर्चा जिल्हा परिषदेत धडकला; घरकुलाची मागणी - 310 families wadegaon
मंत्री नितीन राऊत यांच्या आदेशाने रमाई आवास योजनेचा लाभ वाडेगाव येथील ३१० कुटुंबांना मिळणार आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फेब्रुवारी महिन्यातच प्राप्त झाले आहे. मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे, योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना द्यावा या मागणीसाठी आज प्रमोद डोंगरे यांच्या नेतृत्वात ३१० कुटुंबांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
मंत्री नितीन राऊत यांच्या आदेशाने रमाई आवास योजनेचा लाभ वाडेगाव येथील ३१० कुटुंबांना मिळणार आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फेब्रुवारी महिन्यातच प्राप्त झाले आहे. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे, गटविकास अधिकाऱ्यांनी या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी आणि योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना द्यावा या मागणीसाठी आज प्रमोद डोंगरे यांच्या नेतृत्वात ३१० कुटुंबांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मोर्चा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकला. यावेळी नागरिकांनी सी.ई.ओ सुभाष पवार यांच्याशी घरकूल प्रकरणी थेट चर्चा केली.
हेही वाचा-छायाचित्रासाठी विषयाचे ज्ञान आणि दृष्टीची गरज, पद्मश्री छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचे मत