अकोला - येथील आदर्श कॉलनी मधील एका अपार्टमेंटमध्ये तीन सट्टेबाजांना खदान पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 7 मोबाईल, एक लॅपटॉप, एक टीव्ही संच व इतर साहित्य जप्त केले आहे. हे तिघे विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामन्यावर सट्टे घेण्याचे काम करत होते.
अकोल्यात विश्वकरंडक सामन्यावर सट्टा घेणारे तिघे ताब्यात ; ७ मोबाईल, लॅपटॉप जप्त - सहाय्यक पोलीस निरीक्षक
येथे क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येतो. येथे अनेक दिवसांपासून सट्टेबहाद्दर सक्रिय आहेत.
येथे क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येतो. येथे अनेक दिवसांपासून सट्टेबहाद्दर सक्रिय आहेत. आणि आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा सट्टा क्रिकेटच्या सामन्यांवर लागलेला आहे. येथील आदर्श कॉलनी मधील एका अपार्टमेंटमध्ये संदीप सच्चानंद भारती, हितेशकुमार जयंतीलाल शहा, रोचल उर्फ काली नानकराम वरदानी हे तिघेही पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खदान पोलीस ठाण्याने ही कारवाई केली.
खदानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वानरे, रवी डाबेराव, कपिल राठोड, राजेश तेलगोटे, खुशाल नेमाडे, शेख नदीम, शालू हंबर्डे, मनीषा इंगळे यांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी या तिघांकडून 7 मोबाईल, एक लॅपटॉप आणि एक टीव्ही संच यासह आदी साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा क्रिकेटचे सट्टेबाज सक्रिय झाल्याचे सिद्ध झाले आहे.