अकोला - जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २८ अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अकोल्यात आता फक्त तीन कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर पातूर येथील सात कोरोना रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली असल्याने त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे.
अकोलावासीयांना दिलासा.. प्राप्त झालेले सर्व २८ अहवाल कोरोना निगेटिव्ह
अकोला जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. शुक्रवारी प्राप्त झालेले २८ अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शुक्रवारी पाच जण नव्याने दाखल झाले. आजअखेर जिल्ह्यात २२ अहवाल प्रलंबित आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ५२२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५०० अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ४८४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज अखेर २२ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४०९, फेरतपासणीचे ७९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३४ नमुने होते. आतापर्यंत एकूण ५०० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३९४ तर फेरतपासणीचे ७६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३० अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ४८४ आहे. शुक्रवारी प्राप्त झालेले २८ अहवालात सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.