अकोला - कोरोना रुग्णांचा आज (सोमवारी) सकाळी आलेला अहवाल अकोलेकरांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला. 24 रुग्ण हे पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, रविवारी सायंकाळी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नव्हता. तर नागपूर येथे उपचारासाठी पाठविलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालात 12 महिला व 12 पुरुष आहेत. त्यात पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण हरिहरपेठ येथील, दोन जण कमलानगर, दोन जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प, खदान, गुरुनानक नगर कौलखेड, रणपिसेनगर, मुजफ्फरनगर, अनिकुट पोलीस लाईन, नुरानी मशिद जवळ खदान, खडकी, सरकारी गोदाम खडकी, भरतनगर व पोपटवाडी मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या 58 वर्षिय महिलेचा काल मृत्यू झाला. ही महिला 26 मे रोजी दाखल झाली होती. तिला 29 मे रोजी नागपूर येथे हलविण्यात आले होते, काल 31 मे रोजी तिचा मृत्यू झाला.
*प्राप्त अहवाल-58
*पॉझिटीव्ह-24