अकोला - जिल्ह्यात आज (शनिवार) नवीन 23 कोरोनाग्रस्तांची नोंद आहे. सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालामध्ये 16 रुग्ण सापडले असून यातील 7 रुग्ण हे सकाळी सापडले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 378 वर पोहोचला आहे. तर आज 8 महिला रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
अकोल्यात आज 23 कोरोनाबाधित आढळले; 8 महिला रुग्णांना डिस्चार्ज - अकोला कोरोना अपडेट्स
सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालामध्ये 16 रुग्ण सापडले असून यातील 7 रुग्ण हे सकाळी सापडले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 378 वर पोहोचला आहे. तर आज 8 महिला रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या १६ रुग्णांपैकी नऊ महिला व सात पुरुष आहेत. त्यात दोन जण फिरदोस कॉलनी, दोन जण लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहेत, तर उर्वरित माळीपुरा, मोहम्मद अली रोड, नानकनगर निमवाडी, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, गोरक्षण रोड मलकापूर, यमुना संकुल, श्रावगी प्लॉट, हरिहर पेठ, इकबाल कॉलनी मोहता मिल जवळ, मलकापूर, रेल्वे झोन रामदास पेठ, दसेरा नगर हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, आज आठ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. या आठही महिला आहेत. त्यातील दोघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या दोघी फिरदौस कॉलनी व सुभाष चौक येथील रहिवासी आहेत. अन्य सहा महिलांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून त्या त दोघी जणी फिरदौस कॉलनी येथील तर अन्य रेवतीनगर, सुभाष चौक, माणिक टॉकीज जवळ, लोहिया नगर येथील रहिवासी आहेत.
प्राप्त अहवाल - १५३
पॉझिटिव्ह - २३
निगेटिव्ह - १३०
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ३७८
मृत - २३(२२+१)
डिस्चार्ज - २१९
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - १३६