अकोला -आज दिवसभरात 315 तपासणी अहवालातून 20 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच 38 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
सायंकाळी दाखल सात जणांपैकी सर्व पुरुष आहेत. त्यातील पाच जण हे हरिहर पेठ अकोला येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित दोघे जण आंबेडकर नगर अकोट फैल व सबेरी मशिद अकोट फैल येथील रहिवासी आहेत. यात अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या एका मयत रुग्णाचा समावेश आहे. प्राप्त अहवालात दोन पुरुष रुग्ण मयत झाले आहेत. त्यातील एक सबेरी मशिद अकोट फैल येथील रहिवासी आहे. हा ७१ वर्षीय रुग्ण दि.२३ रोजी दाखल झाला होता. त्याचा मृत्यू दि. २४ रोजी झाला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य रुग्ण हा ६६ वर्षीय आगरवेस जुनेशहर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण १८ तारखेला रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल दि. २२ रोजी आला होता. आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार घेतांना त्याचे निधन झाले. आज दुपारी ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील ३६ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित दोघांना घरी सोडण्यात आले.
आज प्राप्त अहवाल - ३१५
पॉझिटिव्ह - २०
पॉझिटिव्ह - २९५