अकोला -राष्ट्रीय महामार्गावरील नागोली नागठाणा गावादरम्यान जोरदार अपघात झाल्याची घटना घडली. दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अकोल्यात दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचा जागीच मृत्यू - 2 youth died for accident in Akola
राष्ट्रीय महामार्गावरील नागोली नागठाणा गावादरम्यान जोरदार अपघात झाल्याची घटना घडली. दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
![अकोल्यात दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचा जागीच मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5106722-thumbnail-3x2-acccc.jpg)
ज्ञानेश्वर वैजनाथ पाटील(२४), आशिष देविदास कस्तुरे (२२) रा. कंचनपूर ता. खामगाव अशी मृतांची नावे आहेत. ही घटना १८ नोव्हेंबरला घडली. ज्ञानेश वैजनाथ पाटील, आशिष देविदास कस्तुरे हे दोघे दुचाकीने (एम एच २८ एक्स ०३४३) खामगाव वरुन अमरावतीकडे कामानिमित्त जात होते. दरम्यान, समोरुन येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कंचनपूर येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेणे सुरू असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत.