अकोला -जिल्ह्यातील बाळापूर येथे नदीपात्रात बुडून २ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. कुणाल कैलास काळे (वय १०) आणि ऋतीक प्रमोद मोरे (वय ९) अशी मृतांची नावे आहेत.
अकोल्यात नदीपात्रात बुडून दोन बालकांचा मृत्यू
दोन मुले आज सकाळी भीकूंड नदीपात्रात पोहोण्यासाठी गेले होते. मात्र, नदीपात्रात गाळ असल्याने दोघेही गाळात फसले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
काही कुटुंब बुलडाणा तालुक्यातील धाडी येथून बाळापूर येथील विट भट्टीवर काम करण्यासाठी आले आहेत. याच कुटुंबातील दोन मुले आज सकाळी भीकूंड नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, नदीपात्रात गाळ असल्याने दोघेही गाळात अडकले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे प्रभारी ठाणेदार वैभव पाटील घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात बुडालेल्या बालकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.