अकोला - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सकाळी मिळालेल्या अहवालांनुसार आणखी 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनारुग्णांची एकूण संख्या 186 वर गेली, तर एका महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अकोल्यात आढळले 18 कोरोना पॉझिटिव्ह; एका बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू - अकोला महिला रुग्ण मृत्यू
अकोल्यात नवीन १८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने आढळलेल्या १८ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नऊ महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे. तर एका महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
![अकोल्यात आढळले 18 कोरोना पॉझिटिव्ह; एका बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू Corona positive](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7177433-600-7177433-1589349755661.jpg)
कोरोना पॉझिटिव्ह
नव्याने आढळलेल्या १८ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नऊ महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे. यात सात जण खैर मोहम्मद प्लॉटमधील रहिवासी आहेत तर गवळीपुरातील आणि रामनगर प्रत्येकी तीन, बापूनगर, अकोट फैल, सराफा बाजार, जुने शहर पोलीस ठाणे, जुने आलसी प्लॉट येथील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.
दरम्यान, न्यू भिमनगर येथील एका ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला सोमवारी रुग्णालयात दाखल झाली होती. आज १२० अहवाल मिळाले असून यातील १८ पॉझिटिव्ह आणि १०२ निगेटिव्ह आहेत.