अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आज (गुरुवार) हाती आलेल्या 104 जणांच्या अहवालानुसार, 16 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर, 88 जण निगेटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज दोन अंकी आकड्याने वाढ होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्राप्त अहवालात नऊ पुरुष तर सात महिला आहेत. त्यात रेल्वे कॉलनी जठारपेठ येथील तीन जण, फिरदौस कॉलनी येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, नायगाव येथील दोन तर रजतपुरा, ज्योतीनगर सिव्हिल लाईन्स, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पूरपिडीत कॉलनी अकोट फैल, लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एक जण आहेत. 20 मे रोजी भीमचौक अकोट फैल येथील रहिवासी असलेला 68 वर्षीय रुग्ण उपचार घेताना मृत्यू पावला आहे. हा रुग्ण 18 मे रोजी रुग्णालयात दाखल झाला होता.