अकोला- आज दुपारी जुन्या शहरातील गंगा नगरातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. उज्जैन हसन खान असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
अकोल्यात १५ वर्षीय विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला - घनदाट झाडांमध्ये
आज दुपारी जुन्या शहरातील गंगा नगरातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका अज्ञाताने धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. उज्जैन हसन खान असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

धारदार शस्त्राने हल्ला झालेल्या मुलाचे रुग्णालयातील दृष्य
धारदार शस्त्राने हल्ला झालेल्या मुलाचे रुग्णालयातील दृष्य
गंगानगर बायपास जवळील इचे लेआउट मध्ये १५ वर्षीय मुलगा हा शाळेजवळील घनदाट झाडांमध्ये गेला असता, त्याच्यावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मुलाच्या नातेवाईकांना व जुने शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि मुलाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल कले. दरम्यान, पुढील कारवाई पोलीस करीत असून घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.