अकोला - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज सकाळी कोरोनाचे आणखी 14 नवीन रूग्ण सापडले असून 17 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 505 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
अकोल्यात कोरोनाचे आणखी 14 रूग्ण; 17 जणांनी केली कोरोनावर मात - अकोला कोरोना अपडेट
आज अकोल्यात आणखी 14 नवीन रूग्ण सापडले असून 17 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात १८७ अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज सायंकाळी 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी सोडण्यात आले तर दहा जणांना संस्थागत विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या शहरात जिल्हा परिषद कर्मचारी घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीतून आणखी काही रूग्ण समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ७२६ रुग्ण सापडले असून ५०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात १८७ अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.