महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले १३ जण आयसोलेशन वॉर्डात; अकोल्यात भीतीचे वातावरण

अकोल्यात तेरा जणांना आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.या व्यक्ति वाशिममधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल प्रलंबित आहेत.

Akola Corona Update
अकोला कोरोना अपडेट

By

Published : Apr 4, 2020, 9:25 AM IST

अकोला - अकोल्यातील १३ जण वाशिममधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती मिळताच त्यांना शुक्रवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी दाखल केले आहे. या १३ जणांच्या कुटुंबियांना घरीच क्वॉरेन्टाईन ठेवण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

या तेरा जणांमध्ये पातुर आणि खेट्री येथील नागरिकांचा समावेश आहे. अमरावती येथे ते कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. प्रत्यक्ष पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती आढळत असल्याने नागरिकांनी आता तरी कोरोनाला गांभिर्याने घ्यावे. घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील १८ जणांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरित नऊ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. अहवाल निगेटिव्ह आलेल्या ९ जणांना घरीच क्वॉरेन्टाईन ठेवण्यात आले आहे. तर अहवाल प्रलंबित असणाऱया व्यक्ती अद्याप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती खडसे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details