अकोला- दिल्लीतील निजामुद्दीन येथील 'मरकझ' कार्यक्रम आटोपून अकोल्यात 10 जण आले असल्याची माहिती आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाला मिळाली आहे. त्या सर्वांचा शोध पोलीस विभाग घेत असून यात अकोला शहरातील सहा जणांचा तपास लागल्याची माहिती आहे. तर, पातूर आणि बार्शी टाकळी येथील प्रत्येकी दोघांचा तपास करण्यात येत आहे.
दिल्लीच्या मरकझमधून दहाजण अकोल्यात दाखल, शोध सुरू - corona in india
दिल्लीतील निजामुद्दीन येथील 'मरकझ' कार्यक्रम आटोपून अकोल्यात 10 जण आले असल्याची माहिती आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाला मिळाली आहे. त्या सर्वांचा शोध पोलीस विभाग घेत असून यात अकोला शहरातील सहा जणांचा तपास लागल्याची माहिती आहे.
याबाबत पोलीस आणि आरोग्य विभाग काहीही बोलण्यास तयार नाही. यातील कोणीही आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सर्वांचा शोध सुरू आहे. पातूर आणि बार्शी टकली येथील नागरिकांचा शोध लागत नसल्याची माहिती आहे. दिल्ली येथून आलेल्या त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय ते ज्या ठिकाणी राहत आहेत, तो परिसर पोलीस आणि आरोग्य विभाग ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. या सर्व 10 जणांचा शोध आता सुरू झाला आहे.
या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि आरोग्य यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत अधिकृतपणे काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.