शिर्डी :शिर्डी विमानतळावर नोकरीचे आमिष दाखवत बीड जिल्हायातील 11 तरुणांची फसवणुक झाल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी प्रतेकी 5 लाखांची रक्कम एका तरुणांकडून उकळले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर या प्रकरणात मोठी टोळी सक्रिय असण्यची शक्याता पोलिसांनी वर्तवली आहे.
आकरा तरुणांची फसवणूक :डिसेंबर 2022 मध्ये शिर्डी विमानतळावर नोकरी निमित्तान बीड जिल्ह्यातील आकरा तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आल होत. यावेळी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला होता. त्यात सखोल तपास केला असता गोकूळ राजाराम कांदे निफाड, गोकूळ गोसावी सिन्नर, विलास गोसावी सिन्नर अशा तिघांना पोलिसांनी अटक केली.
बनावट नियुक्त पत्र :नोकरी देतो अस सांगत हे भामट्यांनी अफलातून शक्कल लढवली. सुरुवातीला तीघांना शिर्डी विमानतळ बनावट नोकरी नियुक्त पत्र देत घरी बसल्या वीस वीस हजार पगार दिला. त्यामुळे इतर ही बेरोजगार तरुण याकडे आकर्षित झाले. पगार मिळतोय त्याच बरोबर नियुक्त पत्र मिळतय म्हणून तब्बल आकरा युवकांनी यात पाच पाच लाख रुपये देवू केले.