शिर्डी(अहमदनगर)- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर परिसरात असलेल्या लोटीवस्ती याठिकाणी जागेच्या वादातून सायंकाळी सात वाजता गोळीबार झाला. या घटनेत 28 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु झाला.
श्रीरामपूरमध्ये जागेच्या वादातून 28 वर्षीय युवकाची गोळी घालून हत्या - श्रीरामपूर क्राईम न्यूज
जागेवरून वायकर व साळवे यांच्यात वाद होता. या कारणावरून त्यांच्यात शनिवारी सायंकाळी सात वाजता सुमारास वाद झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात साळवे यांचा जागीच मृत्यू झाला.
अशोकनगर फाट्याजवळील लोटीवस्ती परिसरातील जागेवरून वायकर व साळवे यांच्यात वाद होता.या कारणावरून त्यांच्यात शनिवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास वाद झाला,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. साळवे याच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.